Amravati Rain : विदर्भात मुळधार पाऊस; बगाजी सागरचे ७ दरवाजे उघडले

सध्या धरणात ७१.९६ टक्के जलसाठा आहे.
Amravati Bagaji Sagar
Amravati Bagaji Sagar Saam Tv
Published On

अमर घटारे

अमरावती : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून तलाव, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. बगाजी सागर धरणात जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले. वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे. (Amravati Rain Updates)

Amravati Bagaji Sagar
सावधान! पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर फिरायला जाताय? मग ही बातमी वाचाच....

अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बगाजी सागर धरण आहे. धरणाचे पाणी हे उन्हाळ्यात अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या गावांसाठी संजीवनी ठरते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात ७१.९६ टक्के जलसाठा आहे. (Amravati Bagaji Sagar Rain Updates)

Amravati Bagaji Sagar
Rain Update Live : नवी मुंबईत पावसाचा पुन्हा जोर, ताज्या अपडेट्स जाणून घ्या

दरम्यान, धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे वर्धा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नदीपात्रात कुणीही उतरू नये. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com