Manoj Jarange : निवडणूक लढायची नाही, पाडापाडी करायची - मनोज जरांगे

Manoj Jarange on Vidhan Sabha Election : आपली फसगत होईल, त्याऐवजी आपण माघार घेऊयात, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ज्यांन उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्या सर्वांनी माघार घ्यावी, असेही ते म्हणाले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil NewsSaam Tv
Published On

Manoj Jarange on Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज, सोमवारी शेवटची तारीख आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी न आल्यामुळे माघार घेत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा बांधवांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असेही मनोज जरांगे यांनी आवाहन केले. निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सांगतानाच त्यांनी राजकीय पक्षांना इशाराही दिला. त्याशिवाय पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसेल. मराठा बांधावांनी अर्ज मागे घ्यावेत असे जरांगे यांनी सांगितले.

आता निवडणूक लढायची नाही, तर पाडापाडी करायची, उमेदवार पाडायचे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. १०५ जण वाल्यांना दोन जणांना सोबत घ्यावे लागले, असा टोला जरांगेंनी भाजपाला लगावला. मी कुणाला पाडा किंवा पाडू नका, असेही मी म्हणत नाही. पण मराठा समाजाला विश्वासात घेतलं नाही तर पाडणारच असा इशाराही यावेळी मनोज जरांगे म्हणाले.

राजकारण आपला खानदानी धंदा नाही, पुन्हा आपण आपल्या जातीसाठी लढू.. आंदोलन सुरु ठेवणार आहे. मतदारसंघ ठरवले आहेत, याला माघार नाही म्हणता येत. एका जातीवर निवडून येत नाही. थोडक्यात गनिमी कावा म्हणता येईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कारणही सांगितले, नेमकं काय म्हणाले?

महायुती आणि महविकास आघाडी दोघांचाही काहीही उपयोग नाही दोघेही सारखेच आहेत. समाजाला ज्याला मतदान करायचं त्याच्याकडून लिहून घ्या आणि व्हिडिओ करून घ्या. मी कोणाला पाडा म्हणणार नाही कोणाला निवडून आला म्हणणार नाही.समजाने ज्याला पडायचं त्याला पाडा, ज्याला निवडूण आणायचं त्याला आणा. कोणत्याही अपक्षाला पाठिंबा दिला नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

कोणत्याही अपक्षाला आपण पाठींबा दिला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला आपण पाठिंबा दिला नाही. एका जातीवर कुणीच निवडूण येता येत नाही , एवढं राजकीय आकलन मला आहे. राजकीय प्रक्रिया वेगळी आहे. राजकारणात मताची गोळा बेरीज करावी लागते. राजकारणाची प्रक्रिया वेगळी आणि समाजकारणाची प्रक्रिया वेगळी आहे.

मी माझ्या समाजाकडे फिरणार आहे. समाजाने कोणाला पाडा कोणालाही निवडून आणा. मराठ्यांशिवाय राज्यात कोणीही निवडून येणारं नाही. मराठ्यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांच्या प्रचाराला आणि सभेला जायचं नाही. मतदानाच्या दिवशी जायचं मतदान करून मोकळे व्हायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com