Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे.
एकाच जातीवर कसं लढणार, एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही. मराठा समाजाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
काल समाजबांधवाशी मतदारसंघावर सविस्तर चर्चा झाली. पहाटे तीन चार वाजेपर्यंत चर्चा झाली. मित्रपक्षांची यादी अजून आलेली नाही. एका जातीवर निवडून येणं कसं शक्य आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
याला पाड, त्याला पाड म्हणायची इच्छा नाही. आपलं कुणीच नाही. पण मला खवळलं तर बघू... दोन्ही शहाणे नाहीत. तुम्ही कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडून आणा, असे मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेय. मनोज जरांगे यांनी माघार घेतानाच मराठा समाजला मोठा मेसेजही दिला. त्याशिवाय याला माघार म्हणता येणार नाही, हा गणिमी कावा आहे, असे म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले ?
राजकारण आपला खानदानी धंदा नाही, पुन्हा आपण आपल्या जातीसाठी लढू.. आंदोलन सुरु ठेवणार आहे.
निवडणूक लढायचं नाही, पाडापाडी करायची नाही
मतदारसंघ ठरवले आहेत, याला माघार नाही म्हणता येत. एका जातीवर निवडून येत नाही. थोडक्यात गनिमीकावा म्हणा.
महायुती आणि महविकास आघाडी दोघांचाही काहीही उपयोग नाही दोघेही सारखेच आहेत.
समाजाला ज्याला मतदान करायचं त्याच्याकडून लिहून घ्या आणि व्हिडिओ करून घ्या.
मी कोणाला पाडा म्हणणार नाही कोणाला निवडून आला म्हणणार नाही.
समजाने ज्याला पडायचं त्याला पाडा, ज्याला निवडूण आणायचं त्याला आणा
समाजाची आठवण येत असल्याने डोळ्यात पाणी आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.