Konkan Region Election Result 2024: कोकणात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? पाहा निकालाच्या अपडेट्स

Konkan Region Election Result 2024: महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या असून यंदा कोकणात भरघोस मतदान झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी कोकण विभागातून कोणत्या जागा महत्त्वाच्या आहेत ते पाहूयात.
Konkan Region Election
Konkan Region Election saam tv
Published On

महाराष्ट्रातील निवडणूकींच्या निकालाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या कोकणात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यामध्ये कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून कोकण म्हणजे नारायण राणे असं कायमच राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतं. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने कोणाला साथ दिलीये हे स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या असून यंदा कोकणात भरघोस मतदान झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी कोकण विभागातून कोणत्या जागा महत्त्वाच्या आहेत ते पाहूयात.

Konkan Region Election
Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

दापोली मतदार संघ

दापोली मतदार संघात शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळाली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून रामदास कदम आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय कदम यांच्यात लढत असून रामदास कदम आघाडीवर असल्याची माहिती आहे.

रत्नागिरी मतदार संघ

या मतदार संघामध्ये देखील शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत रंगली होती. या ठिकाणी शिंदे गटाकडून उदय सामंत तर ठाकरे गटाकडून बाळ माने शर्यतीत होते. मात्र आकड्यांनुसार, उदय सामंत आघाडीवर आहेत.

कणकवली मतदार संघ

या मतदार संघामध्ये भाजपकडून नितेश राणे आघाडीवर आहेत. तर त्यांच्याविरूद्ध ठाकरे गटाचे संदेश पारकर उभे आहेत.

Konkan Region Election
Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

कुडाळ मतदार संघ

या मतदार संघात मात्र राणेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक आघाडीवर असून शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे पिछाडीवर आहेत.

सावंतवाडी मतदार संघ

या मतदार संघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर आघाडीवर आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे राजन तेली पिछाडीवर आहेत.

Konkan Region Election
Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

श्रीवर्धन मतदार संघ

या मतदान संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा विजय जवळपास निश्चित आहे. यामध्ये शरद पवार गटाचे अनिल नवगणे पिछाडीवर आहे.

महाड मतदार संघ

महाड मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आघाडीवर आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप पिछाडीवर आहेत.

Konkan Region Election
Maharashtra Election Result: वरळीत कांटे की टक्कर, मिलिंद देवरा-आदित्य ठाकरेमध्ये टफ फाईट, कधी आघाडी- कधी पिछाडी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com