Surya Gochar 2023 : सूर्याचा कन्या राशीत प्रवेश! पुढील १ महिना या लोकांनी सावध राहा, धनहानी होण्याची शक्यता

Surya In Kundali : सूर्य कन्या राशीत १७ सप्टेंबरला प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक त्रासही सहन करावा लागू शकतो.
Surya Gochar 2023
Surya Gochar 2023Saam Tv
Published On

Surya Gochar In Kanya 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्यांची विशिष्ट परिक्रमा पूर्ण करुन आपली राशी बदलत असतो. यामुळे अनेक राशींवर त्याचा चांगला वाईट परिणाम होत असतो. ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत १७ सप्टेंबरला प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक त्रासही सहन करावा लागू शकतो.

सूर्य हा ग्रह १८ ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत राहिल त्यामुळे पुढील ३० दिवस काही राशींनी सावध राहाणे गरजेचे आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तसेच अनेक आव्हांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगायला हवी

Surya Gochar 2023
Cloves Benefits : रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ लवंग, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

1. तूळ

येत्या महिन्यात पैशांशी (Money) संबधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच धनहानी होऊ शकते. गुंतवणूक (Investment) करणे टाळा. कामात नुकसान होण्याची शक्यता. नोकरी गमवावी लागू शकते. कामात अधिक लक्ष घाला. अधिक ताणतणावाचा (Stress) सामना करावा लागेल.

2. कुंभ

अशुभ परिणाम मिळतील. कोणताही निर्णय घेताना जपून घ्याल नुकसान होण्याची शक्यता. भावडांशी मतभेद होतील. नकारात्मक प्रभावाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शांत आणि संयम राखा.

3. मीन

कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या घरात आर्थिक संकटाचा काळ सुरू होऊ शकतो. अहंकारी लोक तुम्हाला त्रास देऊ शकतात. गंभीर मानसिक तणावाखाली असाल. त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Surya Gochar 2023
How To Control Overweight : सुटलेलं पोट कमी करायचंय?, आजपासूनच स्वत:मध्ये करा 'हे' बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com