Treatment For Mumps : मुंबईकरांनो सावधान! गालगुंडची साथ वाढतेय; येऊ शकतो बहिरेपणा, कशी घ्याल काळजी

Causes Of Mumps : हिवाळ्यात आजाराचे प्रमाण वाढताना दिसते. हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेक लोकांना होतो. गेल्या काही दिवसात मुंबईत या आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.
Mumbai Mdhe Galgund Chi Sath: Kalji and Lakshane
Mumbai Mdhe Galgund Chi Sath: Kalji and LakshaneSaam Tv
Published On

Rare Mums Effect On Ear :

हिवाळ्यात आजाराचे प्रमाण वाढताना दिसते. दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि जीवनशैली यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेक लोकांना होतो. गेल्या काही दिवसात मुंबईत या आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. हा आजार लहान मुलांना व्हायचा. परंतु आता या आजाराची लागण प्रौढ व्यक्तींमध्ये झाल्याचे दिसून आले आहे.

हिवाळ्यात गालगुंड आजाराचे रुग्ण आढळून येतात. दरवर्षी दिवसाला दोन ते तीन रुग्ण आढळून येतात.मात्र, मागील २० दिवसांत जवळपास ७ ते ८ रुग्ण वाढल्याची माहिती समो आली आहे. यामध्ये ३०-४० वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णांना खूप त्रास होताना दिसत आहे.

Mumbai Mdhe Galgund Chi Sath: Kalji and Lakshane
Health Care Tips: व्यायाम करण्यापूर्वी चहा पिणे योग्य की अयोग्य?

वाढत्या प्रदुषणामुळे संसर्गजन्य आजार वाढताना दिसत आहे. गालगुंडाच्या त्रासामुळे अनेकांना कान दुखणे, कमी ऐकू येणे अशा तक्रारी येत आहेत. याआधी खूप कमी लोकांना कानाचा त्रास व्हायचा. मात्र आता हा त्रास खूप लोकांना होत आहे. कानाचा त्रास सुरू झाल्यावर योग्य उपाय करणे आवश्यक आहे. योग्य उपाय न केल्यास कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घ्यायला हवी.

Mumbai Mdhe Galgund Chi Sath: Kalji and Lakshane
तरुणांनो हृदय जपा! या चुकांमुळे येऊ शकतो Heart Attack, लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध

लक्षणे (Symptoms)

  • गळ्याखाली सूज, ताप येणे.

  • गालाच्या दोन्ही बाजूला एकाचे वेळी सूज येणे.

  • कानाला त्रास होणे.

काळजी कशी घ्याल (Care)

  • गालगुंड झाल्यास गरम पाण्याचा शेक घ्या.

  • गालगुंड झालेल्या जागी हलका मसाज करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्या लोकांना डायबिटिज आणि ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

Mumbai Mdhe Galgund Chi Sath: Kalji and Lakshane
IOCL Recruitement 2023: इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती! १८२० रिक्त पदे, कसा कराल अर्ज?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com