Actress Passes Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

Legend actress passes Away: बॉलिवूडमधील सुवर्णकाळाची साक्ष देणाऱ्या आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामिनी कौशल यांचे निधन झाले आहे.
Veteran Bollywood actress Kamini Kaushal passes away at age 98 due to old age on 14th November
Veteran Bollywood actress Kamini Kaushal passes away at age 98 due to old age on 14th November Saam Tv
Published On

Legend actress passes Away: बॉलिवूडमधील सुवर्णकाळाची साक्ष देणाऱ्या आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामिनी कौशल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८ वर्षाी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार वाढलेल्या आजारांमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे कुटुंबाने गोपनीयता ठेवत अंतिम क्षणांबाबत जास्त माहिती उघड करण्यात आलेली नाही.

पत्रकार विकी लालवानी यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी करताना सांगितले की, “कामिनी कौशल यांचे कुटुंब गहिऱ्या दु:खात असून त्यांना पूर्ण गोपनीयता हवी आहे.” या विधानातून त्यांच्या कुटुंबाच्या भावनिक स्थितीची जाणीव होते. कामिनी कौशल यांचा जन्म १६ जानेवारी १९२७ रोजी लाहोरमध्ये झाला. त्यांच्या आरोग्याबद्दलची सर्वात विशेष बाब म्हणजे बीबीसीच्या माहितीनुसार, त्या ९३ वर्षांच्या होईपर्यंत एकाही औषधावर नव्हत्या. त्यांची जीवनशैली, साधेपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्या दीर्घायुष्याचे कारण मानले जाते.

कामिनी कौशल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वी १९४६ मध्ये ‘नीचा नगर’ या चित्रपटातून केली. हा चित्रपट ऐतिहासिक ठरला कारण त्याला पहिल्या कान्स चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार मिळाला. या चित्रपटामुळे कामिनी कौशल थेट जागतिक मंचावर पोहोचल्या.

Veteran Bollywood actress Kamini Kaushal passes away at age 98 due to old age on 14th November
Eyelashes Care: खोट्या पापण्या वापरणं करा बंद; फक्त या घरगुती सामग्रीच्या तेलाने पुन्हा जाड आणि लांब होतील पापण्या

यानंतर कामिनी कौशल यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल सात दशकांचा प्रवास केला आणि अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांच्या खास अभिनयशैलीमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहिल्या. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये दो भाई (1947), शहीद (1948), नदी के पार (1948), जिद्दी (1948), शबनम (1949), पारस (1949), नमुना (1949), आरजू (1950) अशा अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे.

Veteran Bollywood actress Kamini Kaushal passes away at age 98 due to old age on 14th November
Dharmendra: धर्मेंद्र यांचा आयसीयूमध्ये चोरुन व्हिडीओ काढणं रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पडलं महागात; पोलिसांनी केली अटक

याशिवाय झंझार (1953), जेलर (1958), नाईट क्लब (1958), गोदान (1963) यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सुबक चेहरा, सहज अभिनय आणि गोड व्यक्तिमत्व यांनी त्या जुन्या बॉलिवूडच्या आयकॉन बनल्या. कामिनी कौशल यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक सुवर्णकाळातील तेजस्वी तारा गमावला आहे. सिनेमा क्षेत्रात त्यांचे योगदान अपूर्व असून त्या सदैव भारतीय चित्रपट इतिहासात अजरामर राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com