Rashmika Mandannaची नवी मैत्री ग्लोबल लेव्हलवर चर्चेत; ‘ Stitch’सोबतची अनोखी बॉन्डिंग चाहत्यांच्या मनात करतेय घर

Rashmika Mandanna Latest News: रश्मिका मंदानाची स्टिचसोबतची धमाल मैत्री सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Rashmika Mandanna Latest News
Rashmika Mandanna Stitchinstagram
Published On

देश-विदेशात आपल्या अभिनयाने आणि दिलखुलास स्वभावाने लोकांची मनं जिंकणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यावेळी कारण आहे तिचा नवा खास 'BFF' आणि तो कोणी साधासुधा नाही, तर वॉल्ट डिज्नी स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित समर एंटरटेनमेंट फिल्म ‘लिलो अँड स्टिच’मधील शरारती आणि गोंडस स्टिच!

रश्मिका ही तिच्या मजेशीर भूमिकांसाठी, खास अंदाजासाठी आणि पॉप-कल्चरप्रती असलेल्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती स्टिचसोबत धमाल मस्ती करताना दिसते आणि त्याने सोशल मीडियावर एकच धूम माजवली आहे.

रश्मिका म्हणते, "इतकं क्युट की सांभाळणं कठीण आणि इतकं क्रेझी की दुर्लक्षित करणं अशक्य! माझा बेस्ट फ्रेंड मला वेडसर आणि आनंदाने भरून टाकतोय!

Rashmika Mandanna Latest News
Mughal History: मुघलांच्या राज्यात महाराष्ट्र कसा दिसायचा? दुर्मिळ फोटो आले समोर

कृपया सांगा मी एकटीच अशी नाहीए जी याच्या प्रेमात आहे!" तिच्या या भन्नाट पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्टिचसोबत तिची ही अनोखी मैत्री एका नव्या आणि गोड नात्याची सुरुवात दर्शवते.

फिल्मबद्दल थोडक्यात

‘लिलो अँड स्टिच’ ही एक सुंदर, मजेशीर आणि भावनिक गोष्ट आहे — एका एकट्या हवाईयन मुलीची आणि एका पळून आलेल्या एलियनची, जो तिच्या तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. डिज्नीच्या या आयकॉनिक अ‍ॅनिमेटेड क्लासिकचालाईव्ह-ऍक्शन रिमेक आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. २३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून तो इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Rashmika Mandanna Latest News
Ranveer Singh Dhurandhar: 'धुरंधर'मधील रणवीर सिंहचा खास लूक पाहिलात का? सेटवरचा फोटो लीक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com