Imran Khan: आयराच्या एंगेजमेंटमध्ये भाऊ झाला चॉकलेट हिरो, लूकने वेधले सर्वांचे लक्ष

आमिर खानचा पुतण्या अभिनेता इम्रान खान निळ्या रंगाच्या ब्लेझर आणि पॅन्टमध्ये अतिशय कुल दिसत होता.
Imran Khan
Imran KhanSaam Tv

Imran Khan: बॉलिवूडमध्ये असे बरेच अभिनेते आहेत ज्यांनी अभिनयात पदार्पण करताच त्यांचे चित्रपट हीट ठरले. कारकिर्दीतील पहिला चित्रपट हिट आणि ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर त्या अभिनेत्याची चर्चा सर्वत्र झाली. त्यानंतरचे काही चित्रपट त्याचे फ्लॉप सुद्धा गेले. अभिनयात ठसा उमटवल्यानंतर आणि चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

Imran Khan
Kartik Aaryan: कार्तिकने 'दृश्यम 2' आणि ' भुल भुल्लैया 2'साठी लढवले तर्क, कार्तिकने केला 'हा' खुलासा...

आमिर खानची मुलगी आयराने काही दिवसांपूर्वी मुंबईत बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत एंगेजमेंट केली. यावेळी आयराची आई आमिर खानची एक्स पत्नी रीना दत्त, किरण राव, फातिमा सना शेख आणि इतर अनेकजण या कार्यक्रमात दिसले. मात्र, एका खास पाहुण्याने प्रत्येकाचे लक्ष स्वतः कडे वेधून घेतलं. तो त्याच्या काळातील चॉकलेट हिरो होता. आमिर खानचा पुतण्या अभिनेता इम्रान खान निळ्या रंगाच्या ब्लेझर आणि पॅन्टमध्ये अतिशय कुल दिसत होता.

Imran Khan
Shahrukh Khan Mannat Bungalow: किंग खान शाहरुखचा 'मन्नत' हिऱ्यांनी सजला

'जाने तू या जाने ना' मधून प्रसिद्ध झालेला हा अभिनेता सध्या अभिनयक्षेत्रापासून बराच लांब गेला आहे.तो सध्या सिनेसृष्टीत दिसत नसल्याने चाहत्यांना अतिशय दु:ख देखील होत आहे व त्याची अभिनयाची चर्चा देखील रंगतेय. अमीर खानची मुलगी आयराच्या एंगेजमेंटमध्ये प्रत्येकाचे लक्ष त्याच्याकडे होते. त्याने पुन्हा एकदा अभिनयात पदार्पण करावं ही प्रत्येक चाहत्याची इच्छा आहे.

Imran Khan
HanuMan Teaser: प्रशांत वर्माचा पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असल्याचं पाहून एका चाहत्याने लिहिले की, "अरे देवा! इम्रान... तू खूप देखणा दिसत आहेस." तर एका युजरने लिहिले की, "कृपया त्याला विचारा की तो कुठे आहे ." इम्रानने आपल्या अभिनयाची सुरुवात ' कयामात से कयामत तक'या चित्रपटात बाल कलाकार म्हणून पदार्पण केले होते.

Imran Khan
Vijayanand Trailer: प्रसिद्ध उद्याोजक विजय संकेश्वर यांचा जीवनावर येणार चित्रपट, ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला…

इम्रानने 2008 मध्ये 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तो बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसला. एका मीडिया रिपोर्टनुसार, इम्रानचा मित्र अक्षय ओबेरॉयने सांगितले की, इम्रानने अभिनय जगताला अलविदा केला आहे. इम्रानला चित्रपट दिग्दर्शित करायला आवडेल.

Imran Khan
Alia Bhatta: स्वेट-टी-शर्ट वर आलियाचा कोझी मॉर्निंग लूक

इम्रान प्रसिद्धीपासून दूर जाऊन जवळपास ५ वर्षे झाली आहेत. इम्रान खानच्या इतर चित्रपटांमध्ये मेरे ब्रदर की दुल्हन, दिल्ली बेली, आय हेट लव स्टोरीज, गोरी तेरे प्यार में, लक आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटांचा समावेश आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com