बिस्कीटच्या पुड्यामध्ये एक बिस्कीट कमी देणे ITC कंपनीला चांगलंच महागात पडलं आहे. फक्त एका बिस्कीटसाठी कंपनीला एक लाखांचा भुर्दंड बसल आहे. सनफिस्ट मारी लाईट बिस्कीटच्या पाकिटात एक बिस्कीट कमी असल्याची तक्रार ग्राहकाने केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई येथील पी. दिलीबाबू (P. Dillibabu) यांनी डिसेंबर २०२१ कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी एक सनफीस्ट मारी लाईट बिस्कीटचा पुडा घेतला होता. मात्र पुड्यामध्ये १६ ऐवजी १५ बिस्कीट असल्याचं ग्राहकाच्या निदर्शनास आलं. यानंतर या व्यक्तीने दुकानदार आणि ITC कंपनीकडे याबाबत तक्रार केली. मात्र दोन्हीकडून त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. (Latest Marathi News)
संतापलेल्या दिलीबाबू यांना थेट कंज्यूमर कोर्टात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी कंपनीच्या फसवणुकीचा सगळा हिशेब मांडला. ITC कंपनी रोज ५० लाख बिस्कीटची निर्मिती करते. एका बिस्कीटसाठी ७५ पैशांचा खर्च येतो. या हिशेबाने पाहिलं तर कंपनी रोज ग्राहकांची २९ लाखांची फसवणूक करते.
यावेळी कंपनीने आम्ही बिस्कीट वजनावर विकत असल्याचा दावा केला. सनफिस्ट मारी लाईट बिस्टीट पाकिटाचं वजन ७६ ग्रॅम आहे. मात्र कोर्टाच्या चौकशीत असं दिसून आलं की १५ बिस्कीट असलेल्या पुड्याचं वजन ७४ ग्रॅम आहे. (Tajya Batmya)
कन्जुमर कोर्टाने त्यानंतर मात्र कंपनीला नियमानुसार दंड ठोठावला. नुकसानभरपाई म्हणून दिलीबाबू यांना दोन वर्षांनंतर 1 लाख देण्याचे आदेश कोर्टाने दिले. तसेच कंपनीला बिस्किटांच्या विशिष्ट बॅचची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.