सेना-भाजपचं मिशन 220 धोक्यात?

सेना-भाजपचं मिशन 220 धोक्यात?

निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा युती अगदी सहजपणे 220 जागा जिंकेल, असा आत्मविश्वास दोन्ही पक्षांतून व्यक्त होत होता. मात्र, सध्याची बंडखोरी पाहता, हा आत्मविश्वास कितपत यशस्वी ठरला, हे निवडणुकीनंतरच कळेल.

राज्यात किमान 30 जागांवर युतीच्या उमेदवारांचं भवितव्य बंडखोरांनी अडचणीत आणलंय. इतकंच काय मुंबईतही तीन जागा या बंडखोरांमुळे धोकादायक झाल्यात. मुंबईत वर्सोवा मतदारसंघातून शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. हा अर्ज त्यांनी शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांच्याविरोधात दाखल केलाय. दस्तुरखुद्द मातोश्रीच्या अंगणात वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात भाजपच्या मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून बंड केलंय. 

तर कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेना नेते सतीश सावंत यांनी अर्ज भरलाय. सावंतवाडीत शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात भाजपचे राजन तेली रिंगणात आहेत. कुडाळमध्येही शिवसेना उमेदवार वैभव नाईकांविरोधात भाजपच्या रणजीत देसाईंचं बंड कायम आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात नागपूरमध्येही बंडखोरी दिसून येतेय. रामटेक मतदारसंघात भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरोधात शिवसेनेचे आशिष जयस्वाल रिंगणात आहेत. इतकंच काय विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश पवार दंड थोपटून उभे आहेत.

निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा युती अगदी सहजपणे 220 जागा जिंकेल, असा आत्मविश्वास दोन्ही पक्षांतून व्यक्त होत होता. मात्र, सध्याची बंडखोरी पाहता, हा आत्मविश्वास कितपत यशस्वी ठरला, हे निवडणुकीनंतरच कळेल.


WebTitle : marathi news maharashtra vidhansabha election rebel candidate may damage sena bjps mission 220

 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com