Serial In Ganesh Utsav 2023: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांमध्ये गणेशोत्सवाची धूम...

Chetan Bodke

बाप्पाचे आगमन दणक्यात

गणेशोत्‍सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन दणक्यात होणार आहे.

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv

मालिकेत गणरायाचे आगमन

अनेक गणेशभक्‍तांप्रमाणे झी मराठीचे कलाकार देखील हा सण उत्‍साहात साजरा करण्‍यासाठी सज्ज आहेत. अशातच मालिकेमध्येही गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी दिसून येत आहे.

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv

‘आप्पी आमची कलेक्टर’

अशातच सर्वांची लाडकी ‘आप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतही बाप्पाच्या आगमनाची जोरदार चर्चा होत आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोघांच्याही प्रेमाची ताकद किती आहे, हे पाहायला मिळणार आहे.

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv

‘सारं काही तिच्यासाठी’

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत खोतांच्या घरात सुद्धा गणेश आगमनाची तयारी चालू आहे. रघुनाथ खोत स्वतः मातीचा गणपती तयार करुन त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv

‘तू चाल पुढं’-

‘तू चाल पुढं’ मध्ये अश्विनीची वार्षिक परीक्षा आणि घरात गणपतीची तयारी या सर्वांमुळे तिची धावपळ होते. दरवर्षी प्रमाणे तिने मोदक बनवण्याची ऑर्डर सुधा घेतली असून ती कशाप्रकारे सर्व हॅण्डल करते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती आणि अक्षराच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv

‘नवा गडी नवं राज्य’-

‘नवा गडी नवं राज्य’ मध्ये कर्णिकांच्या घर गणपती विराजमान होणार असून सगळ्यांची धांदल उडाली आहे. आनंदीची गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर पूर्ण करण्याची घाई आहे. ह्यातच तिच्या हाताला जखम होते आणि पूर्ण कुटुंब तिच्या मदतीला धावून येतं.

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv

‘३६ गुणी जोडी’

‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकेत वानखेडेंच्या घरात जल्लोषात गणेश चतुर्थी साजरी होणार असून अमुल्या आणि वेदांताचे कुटुंब जवळ येणार आहे.

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv

NEXT: झक्कास लूक तुझा; रसिकाच्या फोटोंवरून नजर हटेना!

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s