Bharat Jadhav
सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंतही अनेक तरूणी- महिला या जीन्सला पसंती देतात.
आजकाल फॅशन जगतात बॉयफ्रेंड जीन्सची खूप क्रेझ असून बॉयफ्रेंड जीन्सची ही स्टाईल बऱ्याच काळापर्यंत लोकप्रिय राहील असे अनेक फॅशन तज्ज्ञांचं मत आहे.
जीन्सच्या नावामुळे ही जीन्स पुरुषांसाठी आहे, असं अनेकांना वाटतं. पण ही जीन्स महिलांसाठी, तरूणींसाठी आहे.
स्त्रिया त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या जीन्स सारख्या पॅन्ट घालत. कारण ती खूप आरामदायक होत्या. हेच लक्षात घेऊन कंपन्यांनी महिलांसाठी अशी जीन्स डिझाइन केली. ही जीन्स गबाळी न दिसता स्टायलिश दिसते.
अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल मर्लिन मनरोने काही वर्षांपूर्वी याची सुरुवात केली होती. मात्र तिने या पॅन्टचा उल्लेख ‘बॉयफ्रेंड जीन्स’केला नव्हता. परंतु १९६० च्या दशकातही ही जीन्स पसंती उतरली होती.
अभिनेता टॉम क्रूझची माजी पत्नी, केटी होम्सने ती जीन्स घातल्यावर बरीच चर्चा सुरू झाली होती. केटीचा फोटो बऱ्याच फोटोग्राफर्सनी काढला आणि ती ट्रेंडमध्ये आली होती.
रेग्युलर जीन्सपेक्षा बॉयफ्रेंड जीन्स ही पाय आणि मांड्यांच्या इथे लूज, आरामदायी असते.
कमी उंची असणाऱ्या महिलांसाठी उत्तम फॅशन पर्याय आहे.
फिरायाला जाताना जीन्स फोल्ड करणं सोपं जातं.
येथे क्लिक करा