India Tourism: खंडाळ्याला हमखास विसराल! वसईपासून ५ तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर पर्यटन स्थळ

Surabhi Jayashree Jagdish

फिरण्याची ठिकाणं

भारतामध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर राज्यं आहेत. त्यापैकी गुजरात हे एक राज्य आहे, जे पर्यटकांना विशेष आकर्षित करतं.

सुरत

गुजरातमधील प्रमुख शहरांपैकी सुरत हे एक आहे आणि ते एक उत्तम पर्यटन स्थळ मानलं जातं.

सुरतचा किल्ला

सुरतमध्ये फिरण्यासाठी अकबराच्या कारकिर्दीत बांधलेला हा किल्ला पाहण्याजोगा आहे. तो अत्यंत विशाल असून ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

डुमस बीच

सुरतचा डुमस बीच इतका सुंदर आहे की त्याठिकाणी दूरदूरहून पर्यटक आकर्षित होऊन येतात.

सायन्स सेंटर

सुरतच्या सायन्स सेंटरमध्ये विज्ञानाशी संबंधित अनेक माहिती मिळते. विज्ञानाची आवड असलेल्या लोकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

सरथाना नेचर पार्क

सुरतमध्ये सरथाना नेचर पार्क आणि प्राणीसंग्रहालय आहे, जे पर्यटकांसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानलं जातं.

गोपी तलाव

सुरतमध्ये फिरण्यासाठी गोपी तलाव देखील आकर्षक आहे. या तलावाच्या आजूबाजूला अनेक मंदिरे आणि मकबरे पाहायला मिळतात.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा