Priya More
साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा सध्या चर्चेत आहे.
11 वर्षांची सितारा सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सिताराने नुकताच एका ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केले आहे.
सिताराचे हे फोटो टाइम्स स्क्वेअरवर झळकले. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.
सिताराही पहिली स्टारकिड्स आहे जिचे फोटो टाइम्स स्क्वायरवर दाखवण्यात आले आहेत.
या ब्रँडच्या जाहिरातीसाठी सिताराला 1 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
11 वर्षांच्या सिताराच्या चेहऱ्यावर आताच स्टार्सवाली चमक पाहायला मिळत आहे.
इतर स्टारकिड्सप्रमाणे सितारा देखील नेहमी लाइम लाइटमध्ये राहते.
तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सितारा इंस्टाग्रामवर खूप सक्रीय असते. तिचे जवळपास 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.