Dhanshri Shintre
उत्तराखंडच्या रिठल गावातील पंचपुरा भवन हे ५०० वर्षे जुने ऐतिहासिक घर आज एक अनोखा होमस्टे म्हणून पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
प्राचीन रचना, निसर्गरम्य शांतता आणि स्थानिक संस्कृतीचा संगम तुमच्या उत्तराखंड भेटीला एक संस्मरणीय अनुभव देऊ शकतो.
कोटी बनलच्या वास्तुकलेवर आधारित हे घर भूकंप-रोधक बांधकामासाठी ओळखले जाते आणि अनेक मोठ्या भूकंपांतही टिकून राहिलेले आहे.
लाकूड, दगड आणि मातीपासून बनलेले हे देहरादूनमधील घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवणारी नैसर्गिक वास्तू आहे.
तीन मजली या होमस्टेमध्ये ६ ते ८ जण आरामात राहू शकतात आणि बाल्कनीतून निसर्गरम्य दरीचे मोहक दृश्य दिसते.
येथे राहणाऱ्यांना पारंपरिक घरगुती जेवण मिळते, ज्यात डाळ-भात, भाज्या, लाल तांदूळ, मांडव्याची भाकरी आणि जंगली पालेभाज्यांचा स्वादिष्ट समावेश असतो.
सहलीदरम्यान तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग, स्थानिक गावभेट, पक्षीनिरीक्षण आणि गायीचे दूध काढण्याचा खास अनुभव घेऊ शकता, जो खूप आनंददायी ठरतो.
डेहराडून किंवा ऋषिकेश येथून उत्तरकाशीपर्यंत प्रवास करा, तेथून ४३ किमी अंतरावर हे अनोखे होमस्टे तुम्हाला निवांतपणा आणि अनुभव देईल.