Surabhi Jayashree Jagdish
महाशिवरात्रीच्या दिवशी मुंबईतील शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते. रात्रभर अभिषेक, जप, आरती आणि दर्शनाची विशेष व्यवस्था केली जाते.
मुंबईत अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिरं मुंबईत आहेत जिथे या दिवशी खास उत्सव साजरा होतो. यंदाच्या महाशिवरात्रीला तुम्ही घराजवळच्या कोणत्या मंदिरात जाऊ शकता ते पाहूयात
हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि जुनं शिवमंदिर मानलं जातं. गिरगाव चौपाटीजवळ टेकडीवर वसलंय. महाशिवरात्रीला याठिकाणी रात्रभर दर्शन सुरू असते.
बाणगंगा तलावाजवळ असलेलं हे प्राचीन शिवमंदिर आहे. रामाने याठिकाणी वालुकामय शिवलिंग स्थापन केल्याची आख्यायिका आहे. महाशिवरात्रीला विशेष पूजाअर्चा होते.
हे ११व्या शतकातील हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत प्रसिद्ध शिवस्थान आहे. महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते.
माटुंगा परिसरातील शांत मंदिर आहे. याठिकाणी रुद्राभिषेक आणि जप केले जातात. उत्सवाच्या दिवशी विशेष कार्यक्रम होतात.
संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात शिवमंदिर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. महाशिवरात्रीला विशेष पूजाविधी होतात.
चेंबूर–देवनार भागात अनेक स्थानिक शिवमंदिरं आहेत. भक्त मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा करतात. याठिकाणी दूध, बेलपत्र आणि जलाभिषेक केला जातो.