Manasvi Choudhary
शरीरातील थायरॉईडची पातळी वाढली की आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात.
थायरॉईड ही मानेमध्ये स्थित एक लहान ग्रंथी आहे. जी शरीरामध्ये आवश्यक हार्मोन्स तयार करते.
अन्नपचन तसेच शरीराचे तापमान वाढीसाठी या हार्मोन्सची आवश्यकता असते.
शरीरात थायरॉईडची पातळी संतुलित राहण्यासाठी योगासने करणे गरजेचे असते.
भस्त्रिका हा योगप्रकार करताना पाच सेकंद श्वास घ्या आणि सोडा. नियमितपणे असे ५ ते १० मिनिटे केल्याने आराम मिळेल.
कपालभाती केल्याने शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच शरीरातील अशुद्ध घटक बाहेर काढले जातात.
या योग प्रकारात तोंडावाटे श्वास घेऊन ओमचा उच्चार केला जातो. हा व्यायाम नियमितपणे केल्याने थायरॉईडला आराम मिळतो.