जगातील 'या' ५ भागात राहणारी लोक जगतात १०० वर्षापर्यत; काय आहे 'ब्लू झोन्स'चे रहस्य?

Bharat Jadhav

ओलांडतात वयाची शंभरी

जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोकांचे वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत किंवा त्याहून अधिक काळ जगणे ही एक सामान्य बाब आहे. या भागांमधील बरेच लोक वयाची शंभरी पार करत असतात. यातील अनेकजण बऱ्यापैकी सक्रिय आणि निरोगी राहतात.

World’s 5 Blue Zones: What Is the Secret Behind Their Long Lives?

अधिक वर्ष जगतात कसे?

या ठिकाणांना 'ब्लू झोन्स' म्हणून ओळखले जाते. या भागांतील लोक जगातील इतर लोकांच्या तुलनेत अधिक काळ कसे जगतात? याचे कारण विशिष्ट आहार, तेथील भौगोलिक स्थान की त्यांची दैनंदिन जीवनशैली काय आहे?

World’s 5 Blue Zones: What Is the Secret Behind Their Long Lives?

'ब्लू झोन' म्हणजे काय?

जिथे वृद्ध वयापर्यंत जगणाऱ्या लोकांची संख्या असामान्यपणे जास्त असते. संशोधक आणि लेखक डॅन ब्युटनर यांनी ही संज्ञा लोकप्रिय केली. या भागांची ओळख पटवण्यासाठी नकाशावर निळी वर्तुळे काढली गेली होती, म्हणूनच त्यांना 'ब्लू झोन्स' असे म्हटले जाऊ लागले.

World’s 5 Blue Zones: What Is the Secret Behind Their Long Lives?

जगातील पाच ब्लू झोन्स

जगभरात पाच 'ब्लू झोन्स' ओळखले गेले आहेत. यात इकारिया (ग्रीस), ओग्लियास्ट्रा (सार्डिनिया, इटली), ओकिनावा (जपान), निकोया द्वीपकल्प (कोस्टा रिका) आणि लोमा लिंडा (कॅलिफोर्निया, अमेरिका) यांचा समावेश आहे.

World’s 5 Blue Zones: What Is the Secret Behind Their Long Lives?

अन्नामध्ये काय असतं विशेष

या प्रदेशांत राहणाऱ्या लोकांच्या आहारात भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी, हरभरे, अखंड धान्ये आणि सुकामेवा यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. तर, वनस्पतीजन्य पदार्थ आणि निसर्गापासून मिळणारी फळं हा त्यांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग असतो.

World’s 5 Blue Zones: What Is the Secret Behind Their Long Lives?

सात्विक आहार

मांस खाण्याचे प्रमाण साधारणपणे कमी असते. तरीही, काही 'ब्लू झोन्स'मध्ये विशेषतः इकारिया आणि सार्डिनियामध्ये लोक मासे खातात. याचा अर्थ असा नाही की केवळ एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने दीर्घायुष्य लाभते. तर दीर्घकाळापर्यंत संतुलित आणि सात्विक आहार घेणे हीच मुख्य बाब आहे.

World’s 5 Blue Zones: What Is the Secret Behind Their Long Lives?

पोटभरेपर्यंत खात नाहीत

ओकिनावामधील लोकांमध्ये 'हारा हाची बु' (Hara Hachi Bu) नावाची एक जुनी प्रथा किंवा सवय आहे. पोट पूर्ण भरेपर्यंत न खाता, ते साधारण ८० टक्के भरले की जेवण थांबवणे असा होतो. म्हणजेच, ताटातील सर्व अन्न संपवणे किंवा पोटभर खात नाही.

World’s 5 Blue Zones: What Is the Secret Behind Their Long Lives?

स्वतःला सक्रिय ठेवतात

'ब्लू झोन्स'मध्ये राहणाऱ्या लोक व्यायामापेक्षा दैनंदिन कामात अधिक व्यस्त असतात. चालणे, बागकाम, शेती आणि घरगुती कामे यांसारख्या गोष्टी करतात आणि दिवसभर स्वतःला सक्रिय ठेवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World’s 5 Blue Zones: What Is the Secret Behind Their Long Lives?