Finland ठरला जगातील सर्वात आनंदी देश, काय आहेत या देशाची वैशिष्ट्ये?

Manasvi Choudhary

आनंदी देशांचा अहवाल

नुकतीच संयुक्त राष्ट्रांने जगातील सर्वात आनंदी देशांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात फिनलँड सलग पाचव्यांदा जगातील सर्वात आनंद आणि स्वच्छ देश ठरला आहे.

Finland

देशाचे वैशिष्ट्य काय?

फिनलँड देशांच्या आनंदाचे कारण म्हणजे तेथील आर्थिक स्थिती, उच्च दर्जाची शिक्षण संस्था आणि निरोगी जीवनशैली आहे.

Finland

निसर्गाच्या सानिध्यात घालतात वेळ

फिनलँडमध्ये ७५% पेक्षा जास्त भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. येथील लोकांचा असा विश्वास आहे की, जंगलात वेळ घालवल्याने मानसिक शांतता मिळते.

Finland

उच्च दर्जाची शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था

फिनलंडमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत आणि जागतिक दर्जाचे आहे. तसेच, आरोग्य सेवा अतिशय स्वस्त आणि दर्जेदार आहेत. यामुळे नागरिकांना भविष्यातील आर्थिकरित्या सोयीस्कर वाटते.

Finland

सामाजिक विश्वास आणि सुरक्षा

जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी फिनलंड एक आहे. येथील लोकांचा एकमेकांवर आणि सरकारवर प्रचंड विश्वास आहे.

Finland

कामाचा आणि आयुष्याचा समतोल

येथील लोक कामापेक्षा कुटुंबाला आणि स्वतःच्या छंदांना जास्त महत्त्व देतात. कामाचे तास आणि सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेतला जातो.

Finland

जीवनशैली

'सिसु' हा एक फिन्निश शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे 'प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द न सोडणे'. फिनलंडमधील लोक संकटांकडे सकारात्मकतेने पाहतात आणि त्यातून मार्ग काढतात, ज्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खूप सक्षम असतात.

Finland

next: Masala Taak Recipe: पचनक्रिया सुधारण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत, उन्हाळ्यात ताक पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

येथे क्लिक करा...