Sakshi Sunil Jadhav
दरवर्षी १० एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा केला जातो. कारण याचे जनक डॉ. ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म १० एप्रिल १७५५ रोजी झाला होता.
जगातले १० कोटींहून जास्त लोक यावर विश्वास ठेवतात. कारण याचे सहसा दुष्परिणाम होत नाहीत. पण औषधांबाबत काळजी घेणं महत्वाचं आहे.
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. योग्य औषधं आणि डोस ठरवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सुरुवातीलाच सल्ला घेणं गरजेचं असतं.
होमिओपॅथी औषधं तोंडातून थेट रक्तात शोषली जातात. त्यामुळे परिणाम लवकर होतो.
औषध घेताना तोंडात जर काही असेल तर औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो.
औषध घेण्याआधी आणि नंतर 15 ते 20 मिनिटं काही खाऊ नका. कारण अन्नामुळे औषधाची क्रिया कमी होण्याची शक्यता असते. अशाप्रकारे तुमच्या जेवणाची वेळ ठरवा.
तुम्ही जेव्हा औषधं खात असाल तेव्हा, परफ्यूम, अगरबत्तीचा सुगंध घेऊ नका. कारण खूप वासामुळे औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
औषधं हाताने स्पर्श करू नका. कारण हातातला ओलावा किंवा घाण औषधांची गुणवत्ता कमी करू शकते.
ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. कोणत्याही उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.