ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल चुकिच्या आहारामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला पोषक आहार मिळत नाही.
शरीराला पोषक आहार न मिळाल्यास त्वचेसंबंधीत समस्या उद्भवतात. अनेकजण चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यावर हळद, बेसन किंवा मुलतानी मातीचा फेस पॅक लावतात.
चेहऱ्यावरील सुरुकुत्या घालवण्यासाठी या घरगुती टिप्स करा ट्राय.
दिवसभरामध्ये शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करा.
योग्य प्रमाणात व्यायाम करा यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते.
दिवसभर दमल्यामुळे तुमची त्वचा थकलेली वाटते. त्यामुळे रात्री ७ ते ८ तासांची झोप घेणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
तुमच्या आहारात योग्य प्रमाणात पोषणाचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरात पोषणाची कमतरता भासत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.