ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी /संध्याकाळी साडेसहा ते सात या दरम्यान लक्ष्मी येते. अशावेळी दार उघडे ठेवून दारावरील गणपतीची, उंबऱ्याची, तुळशीची पूजा करावी.
उदबत्ती लावावी, धूप लावावा, दुकान/ ऑफिस असेल तर देवाची पूजा आरती करून खडीसाखर, फुटाणे, पेढे गूळ खोबरे यापैकी नैवेद्य देवाला दाखवावा.
पैशाची देवघेव थांबवावी. मीठ तेल देऊ नये.
कमी बोलावे, वादविवाद टाळावेत. नखे काढू नयेत. केस, कपडे, भांडी स्वच्छ करू नये.
केस कापू नयेत. पैसे देताना बोटांची कात्री करू नये.
कोणास जामीन राहू नये. ११.महत्त्वाचे फोन टाळावेत. या काळात नामस्मरण, जप करावा.
देवपूजे नंतर कपाळी गंध लावले घराबाहेर पडताना देवा जवळचे फुल खिशात ठेवून बाहेर पडावे. यामुळे आपल्याला. लक्ष्मीचा वास नक्की जाणवेल.