साम टिव्ही ब्युरो
हिमाचल प्रदेश हे हिवाळी सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत प्रत्येकाचे मन मोहून घेतात.
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच हिमालयातील स्पितीला 'लिटल तिबेट' म्हणून ओळखले जाते.
स्पिती व्हॅली ही शांतता आणि अध्यात्माने भरलेलं आणि भारलेलं एक अद्भुत ठिकाण आहे.
किन्नौर जिल्ह्यातील नदीच्या काठावर वसलेले कल्पा शहर हे देखील उत्तम ठिकाण आहे.
रोहतांगजवळ डोळ्यांचं पारणं फेडणारं नैसर्गिक वैभव आहे. पर्यटकांसाठी येथील भेट ही पर्वणी आहे.
सफरचंद आणि जर्दाळूच्या बागांनी वेढलेले, निसर्गप्रेमींचे आवडते सांगलाचे नयनरम्य घर प्रसिद्ध आहे.
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात २२४६ मीटर उंचीवर हिमालयाच्या कुशीत वसलेले मशोबरा हे एक आकर्षक छोटेसे हिल स्टेशन आहे.