Manasvi Choudhary
थंडीच्या दिवसात प्रत्येकजण त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घेतो.
थंडीत त्वचेप्रमाणे केस देखील कोरडे होण्याची समस्या जाणवते.
थंडीत याच कोरड्या केसांमुळे कोड्यांची समस्या निर्माण होते.
केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तूपाचा वापर केला जातो.
तूपामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे केसांतील कोंडा कमी होतो.
केसातील कोंडा कमी करण्यासाठी तूपासोबत कडुलिंबाचा वापर करा.
कडुलिंबाची १० ते १२ पाने प्रथम मऊ होईपर्यंत कोमट पाण्यात उकळून घ्या
यानंतर या पानांची बारिक पेस्ट करा ही पेस्ट तूपामध्ये मिक्स करा आणि केसांना लावा.
साधारणपणे २५ ते ३० मिनिटे केसामध्ये ही पेस्ट लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका.