Sakshi Sunil Jadhav
स्वप्न ही काल्पनिक असतात. हे प्रत्येकालाच माहित असलं तरी त्याची भीती प्रत्येकाच्या मनात असते.
प्रत्येकालाच भितीदायक स्वप्न पडतात. अशा वेळेस एक भयंकर किस्सा तुमच्यासोबत घडतो.
किस्सा म्हणजे, जेव्हा एखादं भीतीचं स्वप्न आपल्याला पडतं. तेव्हा आपण स्वत: ला वाचवण्यासाठी स्वप्नात खूप जोरजोरात ओरडत असतो. पण कोणालाच आवाज येत नाही.
पुढे आपण याचं वैज्ञानिक कारण समजून घेणार आहोत. याने तुमच्या मनातली शंका कायमची दूर होईल.
जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुमचा मेंदू शरीराच्या स्नायुंना पॅरालाइझ करतो. जेणेकरून तुम्ही स्वपान धावताना बिछान्यातून पडणार नाहीत.
ओरडण्यासाठी वोकल कॉड्स आणि तोंडातल्या मसल्सला हालचाल असावी लागते. मात्र झोपेत हे कार्य थांबत आणि तुमचा आवाज कमी बाहेर येत नाही.
मेंदू तुम्हाला पॅरालाइझ स्थितीत टाकण्याचं कारण म्हणजे, तुम्ही झोपत कोणतीही चुकून वाईट क्रिया करू नये.
काहींना जागेपणी स्लीप पॅरालाइझ जाणवणं नॉर्मल असतं. ही स्थिती फक्त १० मिनिटांसाठी असते. मग पुन्हा तुम्ही नॉर्मल होता.