ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रविवार म्हणजे आपल्या हक्काचा सुट्टीचा दिवस
रविवार हा पुढील आठवड्यात काम करण्याची ऊर्जा देते.
कामाच्या ठिकाणी रविवार हाच सुट्टीचा दिवस का असतो. माहित असुद्या
पूर्वी ब्रिटिशकालीन काळात कामगार सातही दिवस काम करत होते त्यांना सुट्टी नव्हती
पण, ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात असत. मात्र कामगारांसाठी अशी काही परंपरा नव्हती.
काही दिवसानंतर कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेतला, आणि इंग्रजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव मांडला
प्रस्तावात त्यांनी, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी ६ दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्यातील एक दिवस आम्हाला देशाची सेवा तसेच काही सामाजिक कामे कऱण्यासाठी मिळावा. असे म्हटंले होते.
मात्र इंग्रजांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतरही लोखंडे यांनी त्याचे प्रयत्न कायमच ठेवले
अखेर सात वर्षांच्या मोठ्य़ा संघर्षानंतर १० जून १८९० रोजी रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याचे जाहीर करण्यात आली
आजपर्यत रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे.