Chetan Bodke
अनेकजण मुंबईला गेल्यावर आवर्जुन मरीन ड्राईव्हला भेट देतात, समुद्र किनारी असलेल्या त्या खडकावर बसायला अनेकांना आवडतं.
समुद्र किनारी असलेले हे दगडं नेमके कुठून आले?, मानवनिर्मित आहेत का? आणि मुख्य म्हणजे ते तिकडे का ठेवले? आज आपण याबद्दल जाणून घेणार आहे.
मरीन ड्राईव्हची बांधणी १९२० च्या सुमारास करण्यात आली, तिथून मुंबईचं सौंदर्य खूपच सुंदर दिसत असल्याने त्याला ‘क्विन्स नेकलेस’ असं म्हणतात.
तुम्हाला माहित आहे का? मरीन ड्राईव्हवर असलेल्या त्या दगडांना ‘टेट्रापॉड’ असं म्हणतात. अनेकांना टेट्रापॉडवर बसायला फार आवडतं.
पण हे अनेकांना आवडणारे ‘टेट्रापॉड’ नैसर्गिक नसून ते मानवनिर्मित आहेत. एका खास कारणासाठी त्याचा मानवाने समान आकार ठेवला आहे.
समुद्राच्या जवळपास असलेल्या परिसराचा मजबूत आणि भयंकर लाटांपासून संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आले आहेत.
ज्यावेळी समुद्राला उधाण किंवा भरती येते त्यावेळी समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात तेव्हा त्यांचं दूरवर कंपन होतं. त्यामुळे किनाऱ्यावर ते दगडं ठेवले.
हे त्रिकोण आकाराचे असलेले ‘टेट्रापॉड’ शहराला अनेक समस्यांपासून दुर ठेवते.
त्यामुळे ते एकमेकांशी गुंफलेल्या स्थितीत ठेवले, जेणेकरुन ते दगडं भरतीवेळी लहरींचा प्रभाव कमी करू शकतील.
नव्वदच्या दशकात हे दगडं मरीन ड्राईव्ह परिसरात आणले असून त्याचा वजन २ ते १० टन असण्याची शक्यता आहे.
टेट्रापॉडचा सर्वात पहिल्यांदा वापर फ्रान्समध्ये झाला.