ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा तुम्ही आंघोळीनंतर बाहेर येता, तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या हाताची आणि पायांची त्वचा आकुंचन पावते.
त्वचा का आकुंचन पावते आणि विशेषत: ती फक्त हात आणि पायांवरच का आक्रसते.
विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, मानवी त्वचेच्या वरच्या भागावर सेबम नावाचे तेल असते, जे त्वचा ओले करण्याचे काम करते. हे तेल त्वचेचे संरक्षण देखील करते.
जेव्हा एखादी व्यक्ती अंघोळ करताना त्वचेवर पाणी टाकते तेव्हा या तेलामुळे ते पाणी शरीरावरून खाली पडते. यामुळेच आपल्या त्वचेवर पाणी राहत नाही.
जास्तवेळ पाण्यात राहिल्याने तेल कमी होऊ लागते. पाणी त्वचेच्या आत जाते. या प्रक्रियेला ऑस्मोसिस म्हणतात.
हात आणि पायांमध्ये केराटिनचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे हात आणि पायांची त्वचा अधिक आकसते.
तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.