Surabhi Jayashree Jagdish
आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला ‘शरद पौर्णिमा’ किंवा ‘कोजागिरी पौर्णिमा’ असं म्हटलं जातं.
असं मानलं जातं की, याच दिवशी देवी लक्ष्मीचा अवतार झाला होता.
भगवान श्रीकृष्णांनीही याच रात्री गोपिकांसोबत महारास केला होता. म्हणूनच धार्मिक दृष्टिकोनातून शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
असंही सांगितलं जातं की, शरद पौर्णिमेच्या रात्री झोपू नये.
चला जाणून घेऊया, शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण करण्यामागचे कारण काय आहे.
असं मानण्यात येतं की, शरद पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात. या रात्री मंत्रोच्चार, भजन आणि ध्यान केल्याने देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.
अशीही श्रद्धा आहे की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या चांदण्यात अमृताचा वर्षाव होतो. म्हणूनच या रात्री चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याची आणि काही काळ त्या प्रकाशात बसण्याची परंपरा आहे.