Shraddha Thik
भारतात स्नॅक म्हणून आवडली जाणारी ही एक खास डिश आहे, ती म्हणजे समोसा
हा समोसा भारतीयांसोबतच पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसह इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.
असाही एक देश आहे जिथे समोसा खाण्यावर आणि बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
युरोपियन देशांमध्येही भारतीय समोसे पसंत केले जात असताना, आफ्रिकन देश सोमालियामध्ये समोसे खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सोमालियातील एका अतिरेकी गटाचा असा विश्वास आहे की, समोसाचा त्रिकोणी आकार ख्रिश्चन समुदायाच्या प्रतीकासारखा आहे. त्यामुळेच सोमालियामध्ये समोस्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
सोमालियामध्ये समोसा बनवणे, विकत घेणे आणि खाणे यासाठी शिक्षेची तरतूद आहे. समोसे कुजलेले मांस भरलेले असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली होती, असेही अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 व्या शतकाच्या आसपास मध्य आशियातून आलेले अरबी व्यापारी त्यांच्यासोबत समोस्याची रेसिपी घेऊन आले. दहाव्या शतकात लिहिलेल्या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आढळतो.