Dhanshri Shintre
स्मार्टफोन घेताना डिझाइन, कॅमेरा, कार्यक्षमता आणि किंमत या गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेचे असते.
OPPO ने Reno सिरीजचा नवा स्मार्टफोन Reno 14 5G भारतात लॉन्च केला असून, तो अत्याधुनिक फीचर्ससह सज्ज आहे.
फक्त ₹37,999 पासून सुरू होणाऱ्या किमतीत मिळणारा हा स्मार्टफोन आपल्या दमदार फीचर्समुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
Reno 14 5G मध्ये 1.6mm अल्ट्रा थिन बेजल, एयरोस्पेस अॅल्युमिनियम फ्रेम आणि स्लिक ग्लाससह 187g वजन, 7.42mm जाडीची प्रीमियम फील मिळते.
हा फोन फक्त स्टायलिश नाही तर टिकाऊही आहे. त्याची मजबूत फ्रेम ड्रॉप प्रोटेक्शन देते आणि IP66, IP68, IP69 रेटिंगमुळे पाण्यापासून सुरक्षिततेची हमी मिळते.
6.59 इंच AMOLED डिस्प्ले 93.4% स्क्रीन-टू-बॉडी रेशो देतो. 120Hz रिफ्रेश रेटमुळे गेमिंग, स्क्रोलिंग आणि व्हिडीओ स्ट्रीमिंग अनुभव अत्यंत आणि सुंदर होतो.
OPPO Reno 14 5G मध्ये 50MP मुख्य, 8MP वाइड अँगल आणि 50MP टेलीफोटो लेन्ससह ट्रिपल कॅमेरा, 3.5x लॉसलेस आणि 120x डिजिटल झूमसह आला आहे.
Reno 14 5G मध्ये 6000mAh मोठी बॅटरी आणि 80W SUPERVOOC™ फास्ट चार्जिंग आहे, 10 मिनिटांत 6.5 तास YouTube पाहता येतात.