Satish Daud
लग्नानंतर अनेक समाजांमध्ये वेगवेगळ्या चालीरीती आहेत.
लग्न झाल्यानंतर अनेकांच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली जाते.
त्यानंतर नवविवाहित जोडपी जेजूरीला दर्शनासाठी जातात.
पण लग्न झालेली मंडळी जेजुरीलाच का जातात? असा प्रश्न आजही अनेकांना आहे.
जेजुरीला जाण्यामागे अनेकांच्या वेगवेगळ्या भावना आहेत.
खंडेराया हे शिवाचं रुप असल्याचं माणलं जातं, तसेच म्हाळसा देवी ही पार्वतीचं रुप आहे.
त्यामुळे शंकर आणि पार्वतीसारखा आपला संसार व्हावा, असं अनेकांना वाटतं.
म्हणून लग्न झाल्यानंतर अनेक जोडपी देवदर्शनासाठी जेजुरीला जातात.