ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्नाच्या पहिल्या रात्री नव विवाहित दाम्पत्यांना दूध प्यायला दिले जाते.
फार पूर्वीपासूनची ही प्रथा आहे ज्यामध्ये लग्नाच्या पहिल्याच दिवशी नव वर वधूस दूध प्यायला दिले जाते.
हिंदू धर्मानुसार दूध हे शुध्द असून ते शुभ मानलं जाते.
नव दाम्पत्यासाठी हे दूध केसर बदाम मिक्स करून दिले जाते, हे दूध दोघांसाठी गुणकारी असल्याचे मानलं जाते.
नवीन जोडप्याचे एकमेकांशी जास्त मिलन नसते. त्यामुळे एकाच ग्लासात दूध प्यायल्याने नातं लवकरच फुलून येते.
दूध प्यायल्याने लग्नात आलेला थकवा दूर होतो व शारिरात उर्जा प्राप्त होते.
तसेच दूध हे आरोग्यासाठी उत्तम असल्याने त्यात काळे मिरी, हळद मिक्स करून दिल्याने प्रथमच शारिरीक संबंध ठेवताना गुणकारी ठरते.