ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लावणी हा एक पारंपारिक लोककला नृत्यप्रकार आहे जो नृत्य- संगीतातून सादर केला जातो.
पारंपारिक लावणी म्हटली की, त्यावर केली जाणारी वेशभूषा- केशभूषा तसेच त्यावर घातले जाणारे अलंकार यांची सांगडच असते.
ते जरी जड असले तरी त्यांच्या या साजश्रृंगाराने लावण्यवती ह्या आकर्षित करित असतात.
शाहिरी लावणी, बैठकीची लावणी आणि फडाची लावणी हे ते तीन प्रकार आहेत लावणीमध्ये अनेक प्रकारचे ठुमके, उड्या, बसणे, उठणे अश्या अनेक हालचाली असतात.
यामुळे लावणी सादर करताना नऊवारी साडीला विशेष प्राधान्य दिले आहे.
याशिवाय लावणी सादर करताना परिधान केलेले वस्त्र कुठेही हालता कामा नये, पायात अडकता येऊ नये यासाठी साडी नेसण्याची पध्दत ही वेगवेगळी असते.
एकंदरीतच पारंपारिक वेशात लावणी ही सादर केल्याने लावण्यवतीचा ऐट हा साऱ्यांनाच घायाळ करणारा असतो.