Manasvi Choudhary
मोबाईल फोन प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच हातात तुम्हाला मोबाईल पाहायला मिळतो.
बँकपासून ते आधारकार्ड कोणतीही ऑनलाईन सेवा असो मोबाईल फोनचा वापर आवश्यक झाला आहे.
मात्र तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का तो म्हणजे मोबाईल नंबर. प्रत्येकाचा मोबाईल नंबर हा दहा अंकी का असतो.
तुम्ही एखाद्याला नंबर सांगताना एक जरी नंबर कमी सांगितला तरी फोन लागत नाही. मोबाईल नंबर दहा अंकी असण्यामागे कारणे आहेत.
भारतातील मोबाईल नंबरचे नियम TRAI आणि DOT द्वारे निश्चित केले जातात. मोबाईल सेवा सुरू झाल्यानंतर वापरकर्त्यांची ओळख पटावी आणि नेटवर्कमधील अडचणी कमी करण्यासाठी मोबाईल नंबरची लांबी एकसारखी असावी असा निर्णय घेण्यात आला.
भारताची लोकसंख्या ही मोठी आहे. 10 अंकांच्या नंबरमुळे साधारण १० अब्ज इतके वेगवेगळे नंबर तयार होतात.