ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात गॅस सिलिंडरचा वापर होतो.
तुमच्या कधी लक्षात आले आहे का? गॅस सिलिंडरचा रंग लालच असतो.
सामान्यत: लाल रंग धोक्याचे संकेत देतो गॅस सिलिंडरमध्ये धोका असल्याने त्याला लाल रंग दिला आहे.
विज्ञानाच्या दृष्टीने लाल रंग धोक्याचा संकेत देतो यामुळे गॅस सिलिंडरचा रंग लाल असतो.
प्रत्येक गॅस सिलिंडरचा रंग वेगळा असतो. हेलियम गॅस भुरकट, कार्बन डायऑक्साईडचा सिलेंडर राखाडी तर नायट्रस ऑक्साईड गॅस सिलिंडर निळ्या रंगाचा असतो एलपीजी गॅसचा सिलिंडरचा रंग लाल असतो.
गॅस सिलिंडरच्या रंगावरुन त्यात कोणता गॅस जमा आहे, हे समजते.
गॅस सिलिंडर एलपीजीने भरलेले असते. यामुळे सावध करण्यासाठी गॅस सिलिंडरचा रंग लाल दिला आहे.