ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा विशेष मानली जाते. दसऱ्याच्या दिवशी दुपारी ही पूजा केली जाते, या दिवशी अपराजिताची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते, असे सांगितले जाते.
वास्तुशास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा करावी.अपराजिताची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
पूजेसाठी ईशान्य दिशेला जाऊन स्वच्छ जागेवर शेण माळावे. तेथे चंदनाच्या आठ पानांनी कमळाचे फूल बनवा, त्याला अष्टदल चक्र म्हणतात. या चक्राच्या मध्यभागी अपराजिताय नमः या मंत्राने देवी अपराजिताचे आवाहन करा.
अष्टदलाच्या उजव्या बाजूला जयाची तर डावीकडे विजयाची पूजा करावी. जयाची पूजा करताना क्रियाशक्तीय नमः आणि विजया उमायै नमः या मंत्रांनी आवाहन करावे.
दसऱ्याच्या दिवशी अपराजिताची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रात दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दरवर्षी भारतीय लष्कर दसऱ्याच्या दिवशी आपल्या सर्व शस्त्रांची पूजा करते.
या दिवशी शस्त्रांची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो, असे म्हटले जाते.या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गादेवीला प्रसन्न करून भवानी तलवार प्राप्त केली होती.
धार्मिक मान्यतेनुसार रामायण काळापासून शस्त्रपूजेची परंपरा चालत आली आहे.लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी श्रीरामांनी शास्त्रोक्त पूजा करून रावणाचा पराभव केला.