Surabhi Jayashree Jagdish
आपण अनेकदा रस्त्यात बुलडोझर पाहिला असेल. बुलडोझर हा नेहमी पिवळ्या रंगाचा असतो.
मुळात जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात बुलडोझरचा रंग पिवळाच पाहायला असतो.
खोदकामासाठी बुलडोझरचा वापर केला जातो. याच्या वापराने विशेषतः इमारती बांधल्या जातात.
बुलडोझरचा वापर बहुतांशी सरकारी कामांमध्ये करण्यात येतो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, बुलडोझरचा रंग पिवळा का असतो?
पिवळा रंग धूळ, धुकं किंवा अंधारात सहज आणि नीट दिसून येतो.
नैसर्गिकरित्या पिवळा रंग सावधगिरीचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे रस्ता बांधकाम किंवा ट्रॅफिक सिग्नलमध्येही पिवळा रंग वापरला जातो.