ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाचा टिळा तुम्ही पाहिला असेल. त्याच्यावर वरती एक काळ्या रंगाचा टिळा देखील लावला जातो.
पण हा टिळा का लावला जातो ते तुम्हाला माहितीये का?
जितके भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येतात. हे भक्त रात्रभर रांगेमध्ये उभे राहतात त्यावर विठ्ठल भगवान असं म्हणतात की, मी लोकांच्या दर्शनासाठी इथे उभा आहे.
विठ्ठलाच्या म्हणण्यांनुसार, मी त्यांची प्रतीक्षा करतो पण ते लोक माझी प्रतिक्षा करतात हे मला अजिबात स्वीकार नाहीये.
लाखो भक्त येतात त्यांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा लागतात. म्हणून पंढरीचा राजा ज्या भक्तांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागते तो अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारला जातो आणि जिथे जिथे भक्त उभे असतात तिथली माती जमा केली जाते.
ही गोळा केलेली माती चाळली जाते. माती चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेचं पाणी मिसळलं जातं व त्या मातीमध्ये अबीर थोडासा मिश्रण करून हा विठ्ठलाच्या कपाळावरती एक टिळा लावला जातो.
एकंदरीत पंढरीचा कैवारी किती मायाळू आहे जो जगाचा पालन करीत आहे. तो भक्तांच्या पायाची माती कपाळाला लावतो.