Shruti Kadam
सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. मालाडमधील गॅलक्सी रीजेंटच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाल्याची नोंद त्यावेळी पोलिसांनी केली होती.
दिशाने आत्महत्या नाही तर तिची हत्या केल्याचा आरोप, पाच वर्षानंतर दिशा सालियानच्या आई वडिलांनी केला. त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
या याचिकेमुळे दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. हायकोर्टात याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव घेतले आहे.
रिपोर्ट्सनुसार, 8 जून 2020 रोजी दिशा सालियानच्या मालाडच्या घरी पार्टी सुरु होती. त्या पार्टीत आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरियाची उपस्थित होते.
दिशा सालियानच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून शरीरावरील जखमांचा उल्लेख वगळण्यात आला. तसेच फोरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दिशाच्या कथित आत्महत्येनंतर १४ जून २०२० रोजी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला.
५ वर्ष उलटून गेले तरी दिशा आणि सुशांतच्या केसचा तपासात कुठेही यश आले नसून या दोघांची आत्महत्या आहे की हत्या, याचे गूढ कायम आहे.
या घटनेवेळी आदित्य ठाकरे आणि सुशांत सिंग याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ फोन झाल्याचा आरोप केला जातोय.
दिशा सालियान प्रकरणी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप केला जात आहे.
आदित्य ठाकरे यांनी कोर्टाने बोलवल्यास उपस्थित राहू, असे म्हटले आहे.