Manasvi Choudhary
विमानात बसल्यानंतर मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवण्याच्या सुचना दिल्या जातात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, विमानात मोबाईल फ्लाईट मोडवर का ठेवतात?
विमान प्रवासादरम्यान विमानचालक आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संभाषण हे रेडिओ फ्रिक्वेंसीद्वारे होत असते.
आपण जेव्हा जमिनीवर असतो, तेव्हा आपला मोबाईल फोन सतत वेगवेगळ्या मोबाईल सिग्नल्स शोधत असतो. पण जेव्हा विमान आकाशात उंचावर झेप घेते तेव्हा ते परिणाम करते.
विमानात बसल्यानंतर मोबाईल फ्लाईट्स मोडवर का ठेवतात? त्यामागची कारणे नेमकी काय आहेत ती जाणून घ्या.
जेव्हा विमान हवेत असते, तेव्हा पायलट जमिनीवरील एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात असतात आणि तिथून सूचना घेत असतात. जर विमानातील प्रवाशांचे मोबाईल चालू असतील, तर ते मोबाईल अतिशय वेगाने सिग्नल शोधण्याचा प्रयत्न करतात. या सिग्नलच्या लहरींमुळे पायलटच्या हेडफोनमध्ये त्रासदायक आवाज येतो.
विमानाला रस्ता दाखवण्यासाठी आणि हवामानाची माहिती मिळवण्यासाठी विमानात खास 'रेडिओ नेव्हिगेशन सिस्टीम' असते. हजारो फूट उंचावर मोबाईलचे सिग्नल्स या यंत्रणेच्या लहरींशी (Radio Frequencies) भिडतात. यामुळे पायलट्सना खालून मिळणारे संदेश स्पष्ट ऐकू येत नाहीत, ज्यामुळे विमानाची दिशा चुकण्याचा किंवा धोक्याची पूर्वकल्पना न मिळण्याचा धोका वाढतो.
उंचावर गेल्यावर कोणतेही मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसते. अशा वेळी मोबाईलचे नेटवर्क स्कॅनर जास्तीत जास्त ताकदीने सिग्नल शोधण्याचा प्रयत्न करते. यामुळे तुमचा मोबाईल खूप जास्त गरम होतो आणि त्याची बॅटरी काही मिनिटांतच वेगाने संपून जाते.