Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच जणांना रात्री ७ ते आठ तास झोपूनही सकाळी उठल्यावर थकवा आणि आळस जाणवतो. अनेकांना सकाळी उठल्यानंतर शरीर जड वाटते आणि कोणतंही काम करण्याचा उत्साह राहत नाही.
तज्ज्ञांच्या मते, रात्री सतत झोपमोड होत असेल तर पुरेशी झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवू शकतो.
दररोज वेगवेगळ्या वेळी झोपल्यामुळे शरीराचं जैविक घड्याळ बिघडतं आणि सकाळी सुस्ती जाणवते.
झोपण्याच्या काहीवेळ आधी मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यामुळे झोपेच्या नैसर्गिक चक्रावर परिणाम होऊ शकतो.
दिवसभर पुरेसं पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशन होऊन थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
लोह आणि व्हिटॅमिन बी१२ यांसारख्या पोषक घटकांची कमतरता असेल तर सतत थकवा जाणवू शकतो.
दिवसभर एकाच जागी बसून राहिल्यावर शारीरिक हालचाल कमी होतात आणि शरीरात सुस्ती जाणवू शकते.
कामाचा ताण, टेन्शन आणि सतत विचार करण्याच्या सवयीमुळे झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.