Surabhi Jayashree Jagdish
क्रिकेटच्या सामन्यात तुम्ही अंपायरला कधी ना कधी कात्री धरलेलं पाहिलं असेल.
बर्याच लोकांना हे पाहून आश्चर्य वाटते की अंपायरकडे कात्री का असते.
खरं तर अंपायरकडे कात्री असण्यामागे एक अतिशय महत्त्वाचे कारण आहे.
जेव्हा गोलंदाज बॉल टाकतो, तेव्हा कधी कधी चेंडूची शिलाई सैल होते आणि त्यातून धागा बाहेर येतो.
जर तो धागा तसाच सोडून दिला, तर गोलंदाजाला फायदा होऊ शकतो, जसं की चेंडू अधिक स्विंग होणे.
यामुळे खेळात गडबड होऊ शकते, जी नियमांच्या विरुद्ध आहे. म्हणूनच अंपायर आपल्या सोबत कात्री ठेवतात. जेणेकरून बाहेर आलेला तो धागा ते लगेच कापू शकतील.
यामुळे खेळ निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने सुरू राहतो आणि ह्याच कारणामुळे प्रत्येक अंपायरकडे कात्री असणे आवश्यक असते.