Sakshi Sunil Jadhav
गरम वातावरण किंवा जाड ब्लँकेटमुळे शरीराचे तापमान वाढते आणि घाम येतो.
जास्त तणाव किंवा टेन्शन असल्यास झोपेतही शरीर घामाने प्रतिक्रिया देऊ शकते.
ताप, सर्दी किंवा इतर संसर्गामुळे रात्री जास्त घाम येणे सामान्य आहे.
हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे काही लोकांना रात्री घाम येऊ शकतो.
काही औषधांच्या साइड इफेक्टमुळे रात्री घाम येण्याची समस्या होऊ शकते.
झोपण्याआधी मसालेदार अन्न किंवा मद्यपान केल्याने शरीराचे तापमान वाढू शकते.
डायबेटीज असलेल्या काही व्यक्तींमध्ये रात्री साखर कमी झाल्याने घाम येतो.
घाम वारंवार येत असेल किंवा त्यासोबत इतर त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.