Surabhi Jayashree Jagdish
वय वाढत गेल्यानंतर महिलांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.
त्याचबरोबर वय वाढत गेल्यानंतर महिलांमध्ये पांढऱ्या स्त्रावाची (व्हाइट डिस्चार्ज) समस्या देखील सामान्यपणे दिसून येते.
वय वाढल्यावर महिलांमध्ये पांढऱ्या स्त्रावाची समस्या का निर्माण होऊ लागते हे जाणून घेऊया
महिलांमध्ये पांढऱ्या स्त्रावाचे मुख्य कारण हार्मोनल बदल, विशेषतः इस्ट्रोजेनमधील बदल असतात.
याशिवाय अस्वच्छ सार्वजनिक शौचालयांचा वापर करणं किंवा गुदद्वाराच्या संसर्गामुळेही पांढऱ्या स्त्रावाची समस्या होऊ शकते.
पीरियड्सच्या काळात होणाऱ्या बदलांमुळे देखील पांढऱ्या स्त्रावाची समस्या उद्भवू शकते.
अनेक प्रकारची अँटिबायोटिक औषधे घेतल्याने हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्यामुळेही पांढऱ्या स्त्रावाची समस्या निर्माण होऊ शकते.
पांढऱ्या स्त्रावाच्या समस्येपासून वाचण्यासाठी महिलांनी दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.