टॉयलेटमध्ये का असतात फ्लशची दोन बटणं? योग्य वापर तुम्हाला माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

टॉयलेट फ्लश बटण

टॉयलेट फ्लश बटण. हे टॉयलेटमधील फ्लश बटन आपण दररोज पाहतो पण त्याची दोन बटणं वेगवेगळी का आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे.

संशोधन

WIT नावाच्या एका संस्थेने एक संशोधन प्रसिद्ध केलंय. ज्यामध्ये ८५ टक्के लोकांना अजूनही शौचालयात दिलेल्या दोन बटणांचा योग्य वापर माहित नाहीये.

पाणी बचत जागरूकता

WIT ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरात पाणी बचतीबद्दल जागरूकता पसरवण्याचं काम करते.

सत्यता

बऱ्याचदा लोकांचा असा विश्वास असतो की, टॉयलेट फ्लशची दोन्ही बटणं सारखंच काम करतात. परंतु सत्यता पूर्णपणे वेगळी आहे.

ड्युअल फ्लश सिस्टीम

ही दोन्ही बटणं 'ड्युअल फ्लश सिस्टीम'चा भाग आहेत. जी विशेषतः पाणी वाचवण्याच्या उद्देशाने डिझाइन केलीयेत.

हाफ फ्लश

टॉयलेट फ्लशवरील लहान बटण 'हाफ फ्लश' साठी आहे, म्हणजेच लघवी केल्यानंतर ते वापरावं. यासाठी अंदाजे ३ लिटर पाणी वापरलं जातं.

फुल फ्लश

टॉयलेट फ्लशवरील मोठं बटण 'फुल फ्लश' साठी आहे. शौचानंतर अधिक स्वच्छता आवश्यक आहे. ते अंदाजे ६ लिटर पाणी वापरते.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा