Bharat Jadhav
जीवनशैलीशी संबंधित समस्या येणं सामान्य झाल्या आहेत, कारण आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेपासून ते आपल्या खाण्याच्या सवयींपर्यंत सर्व काही बिघडले आहे. यामुळे लोकांना केवळ किरकोळ आरोग्य समस्याच नाहीत तर मोठ्या आजारांनाही तोंड द्यावे लागते.
अनेक महिलांना आता चेहऱ्यावरील केसांची वाढू लागलेत. अनेक महिलांच्या ओठांवर पुरुषांप्रमाणे मिशी येऊ लागते. त्यामुळे मुली ते केस काढण्यासाठी व्हॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रिम लावत असतात.
तुमच्या चेहऱ्यावरील दाढीसारखे केस वाढण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करण्याऐवजी, त्याचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. महिलांच्या चेहऱ्यावर केस येऊ लागल्याने अनेक महिला तणावात राहतात. पण त्यांना यामागील खरे कारण माहित नाही. यामुळेच त्या चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी सोशल मीडियावर सुचवल्या जाणाऱ्या अनेक उपायांवर विश्वास ठेवत असतात.
दिल्लीतील केस प्रत्यारोपण सर्जन डॉ. जांगीड म्हणतात की महिलांच्या चेहऱ्यावरील केसांची वाढ, दाढी किंवा मिशांची वाढ, ज्याला वैद्यकीय भाषेत हर्सुटिझम म्हणतात. हे पुरुषांमध्ये आढळणारे जाड, काळे आणि खरखरीत चेहऱ्यावरील केसांच्या वाढीद्वारे दर्शविले जाते.
हे प्रामुख्याने हार्मोन्समुळे होते. पुरुष आणि महिला दोघांमध्येही पुरुष आणि स्त्रीचे हार्मोन्स असतात. जर एखाद्या महिलेमध्ये थोडे जास्त पुरुष हार्मोन्स असतील तर छाती आणि दाढीसारख्या शरीराच्या काही भागांवर केस वाढण्याची शक्यता अधिक असते.
डॉ. जांगिड म्हणतात की महिलांच्या चेहऱ्यावर पुरुषांसारखे केस येण्याची ही स्थिती बहुतेकवेळा अनुवांशिक असते. त्यामुळे २० ते ३० टक्के महिलांना होण्याची शक्यता असते. कधीकधी काही औषधे आणि वाईट जीवनशैलीमुळे देखील हे होऊ शकते.
या स्थितीला PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) किंवा PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) असेही म्हणतात. या स्थितीत पुरुष सेक्स हार्मोन्स (विशेषतः अँड्रोजन) वाढतात. हे ही समस्या १६-१७-१८ वर्षांच्या आसपास म्हणजेच किशोरावस्थेत वाढू शकतात.