Surabhi Jagdish
हॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमा 'पायरेट्स ऑप द कॅरेबियन'तुम्ही पाहिला असेल. यामध्ये समुद्री डाकूंच्या दाखवण्यात आलेत.
मात्र तुम्ही कधी विचार केलाय का या समुद्री डाकूंच्या एका डोळ्यावर काळी पट्टी का असते?
समुद्री डाकू अनेक महिने समुद्रातून प्रवास करतात. प्रवास करताना ते जहाजावर उभं राहून आसपासच्या सुरक्षेवर लक्ष ठेवत असतात.
सुरक्षा करत असताना अनेकवेळा ते जहाजावरुन डेकमध्ये जातात. जहाजाच्या डेकमध्ये काळोख असून ते सतत अंधारातून उजेडात ये-जा करतात.
मनुष्य उजेडातून अंधाराकडे जातो तेव्हा बुबुळं सामान्यपेक्षा जास्त मोठी होतात.
मात्र ज्यावेळी मनुष्य अंधारातून बाहेरच्या प्रकाशात येतो तेव्हा उजेडामुळे पटकन समोरची गोष्ट पाहाता येत नाही. त्यावेळी डोळ्यांची उघडझाप होते.
यासाठीच समुद्री डाकूंना एका डोळ्यावर पट्टी बांधण्याचा फायदा होतो. त्यांच्या एका डोळ्याला आधीच अंधारात राहण्याची सवय झालेली असते.