Saam Tv
टिटव्या फक्त रात्रीच ओरडतात असं नाही. त्या दिवसा देखील ओरडतात; मात्र दिवसा वाहने, माणसं आणि गोंगाटामुळे त्यांचा आवाज जाणवत नाही.
रात्री शांत वातावरणात टिटव्यांचा इशारादायक आवाज लांबवर ऐकू येतो, त्यामुळे लोकांना तो जास्त जाणवतो.
टिटवी हा पक्षी दिवसाही सक्रिय असतो, मात्र अंधारातही पाहण्याची त्याची दृष्टी उत्तम असल्याने तो रात्रीही सतर्क राहतो.
टिटव्या झाडावर घरटी बांधत नाहीत. त्या मोकळ्या जागी, थेट जमिनीवर अंडी घालतात, त्यामुळे त्याचा धोका जास्त असतो.
कोल्हा, मांजर, साप, मुंगूस, घोरपड यांसारखे प्राणी जवळ आले की टिटव्या जोरात ओरडून सावध करतात.
टिटव्यांचं ओरडणं म्हणजे वाईट घडणार याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही; ही अंधश्रद्धा आहे.
टिटवी हा निसर्गाचा सजग आणि सतर्क पक्षी असून, तो फक्त आपल्या अंड्यांचे आणि परिसराचे रक्षण करत असतो.